खैर वाहतूक प्रकरणातील तिन्ही संशयीतांची जामीनावर मुक्तता

सावंतवाडी । प्रतिनिधी : खैराची अवैध वाहतूकप्रकरणी वन कोठडीत असलेल्या तिघा संशयितांची कोठडीचे मुदत संपल्याने त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. गंगाराम रामा कोकरे (वय ३७, बाबुराव भागू कोकरे, वय ५० दोघे रा. निरवडे) व अनिल विठ्ठल झोरे (वय २७) अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यांना गुरुवारी बांदा दोडामार्ग रस्त्यावर खैराची वाहतूक करताना वनविभागाच्या भरारी पथकाकडून पकडण्यात आले होते. यावेळी त्यांच्याकडून ओमनी कार व खैराचे लाकूड तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता २ दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्यांना पुन्हा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्यांना प्रत्येकी २५ हजाराचा सशर्थ जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी ॲड. नीलिमा गावडे व कौस्तुभ गावडे यांनी काम पाहिले.