इन्फिगो आय केयरमध्ये डोळ्यांचा पडदा तपासणी शिबिर

लांजा येथे २६ मार्च आणि रत्नागिरीत २५, २७ व २८ रोजी शिबिर

 रत्नागिरी  : गेल्या चार वर्षांत डोळ्यांविषयक सर्व काही उपचार प्रणाली उपलब्ध करून ठसा उमटवणाऱ्या इन्फिगो आय केअर हॉस्पीटलमध्ये पुढील आठवड्यात रेटिनातज्ज्ञ डॉ. प्रसाद कामत येणार आहेत. ते डोळ्यांच्या पडद्याच्या आजारावर तपासणी, शस्त्रक्रिया करणार आहेत. रत्नागिरीमध्ये दि. २५ आणि २७ व २८ रोजी डॉक्टर उपलब्ध आहेत. तसेच लांजा येथे दि. २६ मार्चला दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत डॉ. कामत तपासणी करणार आहेत. जास्तीत जास्त रुग्णांनी पूर्वनोंदणी करून तपासणीला यावे, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पीटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले आहे.

रत्नागिरीत सप्टेंबर २०२० पासून साळवी स्टॉप येथे इन्फिगो आय केअर हॉस्पीटल सुरू झाले. गेल्या चार वर्षांत हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. याबद्दल रुग्णसुद्धा समाधानी आहेत. ४० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, अचानक दृष्टी कमी झाली असेल तर, डोळ्यांपुढे काळे ठिपके असल्यास, डायबेटीस असल्यास, ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास, चष्म्याचा नंबर सतत बदलत असल्यास, पडद्यावर सूज अथवा रक्तस्राव असेल तर किंवा -३ पेक्षा जास्त नंबरचा चष्मा असेल तर डॉक्टरांकडे रेटिना तपासणी करावी.

डोळ्यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नामवंत तज्ञांकडून ही तपासणी करण्याची सुविधा इन्फिगो आय केयर हॉस्पिटल रत्नागिरी येथे दिनांक २५ आणि २७ व २८ मार्च रोजी सकाळी १० पासून शिबिर चालू राहील. लांजा येथील इन्फिगो ३ डी आय क्लीनिक येथे दि. २६ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिर होईल. तरी ज्यांना ही संधी घेण्याची आवश्यकता वाटते त्यांनी आपल्या डोळ्याची विशेष तपासणी या काळात आधुनिक अशा ३ डी स्कॅनमार्फत पूर्वनोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

पूर्वनोंदणीसाठी रत्नागिरी – ९३७२७६६५०४/९३७२७६६५०८ आणि लांजा – ९३७२७६६५१० या नंबरवर संपर्क साधावा.