खेड(प्रतिनिधी)
येथील रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर मद्य प्राशन करून आरडाओरड करणाऱ्या एकावर येथील पोलीस स्थानकात सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार २३ मार्च रोजी रात्री ९.२० वाजण्याच्या सुमारास घडला.
पी.सुनु कुमार असे त्या आरडाओरड करणाऱ्या चे नाव आहे तर या प्रकरणी पोलीस कर्मचारी शबाना असलम मुल्ला यांनी तक्रार दाखल केली. खेड रेल्वे स्टेशन प्लाटफॉर्म क्र ०१ ता खेड येथे दारुच्या नशेत मोठमोठ्याने आरडाओरडा करुन सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केली म्हणुन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम-८५ (१) (२) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम- ११०/११२ व ११२/११७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










