कळंबणी फौजदारवाडीतील पाणीटंचाई मिटली

 

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील कळंबणी-फौजदारवाडी येथील ग्रामस्थांना भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली आहे. बहीरवली येथील सामाजिक कार्यकर्ते खालिद चौगुले यांच्या माध्यमातून विंधन विहिरी सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना करावी लागणारी वणवण थांबणार असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

कळंबणी – फौजदारवाडी येथील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईची समस्या सतावत होती. वर्षानुवर्षे पायपीट करावी लागत होती. ग्रामस्थांना पाण्यासाठी मैलोनमैल पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी
ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त खालिद चौगुले यांच्याकडे धाव घेतली होती. या मागणीची गंभीर दखल घेत दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून चौगुले विहिरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
या विंधन विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची चिंता मिटली आहे. दरवर्षी ग्रामस्थांना सतावणारी पाणीटंचाईची समस्या खालिद चौगुले यांनी संपुष्टात आणल्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.