जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे आयोजन

दापोली | प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील आझादवाडी विकास मंडळ गिम्हवणे यांचेतर्फ प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे आयोजन दिनांक २६ मार्च ते २८ मार्च २०२४ रोजी
श्री संत तुकाराम महाराज मंदिर आझादवाडी गिम्हवणे येथे आयोजन करण्यात आले आहे.
जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज मुख्य सोहळा बुधवार, दि. २७ मार्च २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. २६ मार्च २०२४ रोजीसकाळी ९ ते १० वा. – मूर्ती अभिषेक, सायं. ७ ते ८.३० वा. – हरिपाठ (ओम आदिनाथ वारकरी सांप्रदाय, चंद्रनगर दापोली गिम्हवणे ग्रुप), रात्रौ. ९.३० ते ११ वा. – स्थानिक भजन (आझादवाडी विकास मंडळ, गिम्हवणे)

बुधवार, दि. २७ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते १२ वा. – किर्तन (ह.भ.प. श्री. गणेश महाराज शिगवण (किर्तनकार), मु. कळंबणी, ता. खेड), दुपारी १ ते ४ वा. – दिंडी मिरवणूक, दुपारी २ ते ४ वा. – श्री सत्यनारायणाची महापूजा (आयोजक: आझाद महिला मंडळ, आझादवाडी), सायं. ५ ते १० वा. तिर्थ प्रसाद, रात्रौ ९.३० वाजता डबलबारी भजन श्री स्वामी समर्थ सेवा भजन मंडळ भांडुप विरुद्ध श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ, पावशी, २८ मार्च २०२४ रोजी दुपारी महाप्रसाद व रात्रौ ९.०० वाजता सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आझादवाडी विकास मंडळ, नवजवान क्रिडा मंडळ व आझाद महिला मंडळ यांनी केले आहे.