दापोली : दापोली सायकलिंग क्लबचे सुरज भुवड व किरण भुवड यांनी अंधेरी मुंबई ते दापोली असा २५० किमीचा प्रवास सायकलने करत पर्यावरणपूरक होळी उत्सव याबद्दल जनजागृती केली.
दापोली तालुक्यातील आंबवली गावातील सुरज भुवड (वय २५) व किरण भुवड (वय १८) शिक्षणानिमित्त मुंबईत वास्तव्याला आहेत. हा २५० किमीचा सायकल प्रवास सुरज व किरण यांनी एका दिवसात पूर्ण केला. त्यांचा मार्ग मुंबई अंधेरी, पनवेल, कोलाड, माणगाव, महाड, लाटवण घाट, पालगड, दापोली असा होता. २३ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता अंधेरीहून सुरु झालेला सायकल प्रवास दुसरे दिवशी सकाळी १० वाजता आंबवली दापोली येथे संपला. या खडतर सायकल प्रवासात ठिकठिकाणी स्वागत, पाहुणचार आणि गप्पा गोष्टी झाल्या. पर्यावरण पूरक होळी, रंगपंचमी उत्सव हा संदेश घेऊन निघालेल्या त्यांना सायकल प्रवासासाठी शुभेच्छा मिळाल्या












