मळेवाड येथे दुचाकी अपघातात बेळगाव येथील दोघे जखमी 

 

 

न्हावेली । प्रतिनिधी :      मळेवाड येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात बेळगाव येथील दोघेजण जखमी झाले. दयानंद शेट्टीगर ( वय ५४ ) व मुकुंद मूतकेकर ( वय ५० ) अशी त्यांची नावे असून दयानंद शेट्टीगर यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

दरम्यान, अपघातानंतर दुसऱ्या दुचाकी चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मळेवाड येथे घडली.

अपघातानंतर जखमी शेट्टीगर यांना उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रथमोपचारानंतर त्यांनी अधिक उपचारासाठी आपण बेळगाव येथे जात असल्याचे सांगितले. या अपघाताबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.