लांजा (प्रतिनिधी) सकल हिंदू समाज लांजाच्या वतीने गुरुवार दिनांक २८ मार्च रोजी लांजा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
या शिवजन्मोत्सव सोहळ्यांतर्गत गुरुवारी सकाळी ९.३० वाजता श्रीराम मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक साटवली रोड अशी पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता मूर्ती पूजन व पाळणा आणि त्यांचा ११ ते रात्री ९.०० महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. रात्री आठ वाजता दिपोत्सव आणि महाआरती असे कार्यक्रम होणार आहेत.








