शिव फाटा नजीक कारच्या धडकेत वृद्ध ठार 

खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गा वरील शिवफाटा नजीक एस यु व्ही कारच्या धडकेत ७८ वर्षीय वृद्ध ठार झाला ही घटना २१ मार्च रोजी सकाळी ११.३० वा. चे सुमारास घडली या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

अक्षय किशोर पवार वय २८ वर्षे रा. पवारआळी राममंदीरजवळ ता चिपळुण जि रत्नागिरी. असे त्या गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे तर

राजाराम गणपत काणेकर वय ७८ वर्षे रा मोरवंडे सुतारवाडी ता खेड असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे

 

या प्रकरणी संदिप हरिश्चंद्र काणेकर वय ४७ वर्षे रा. मोरवंडे सुतारवाडी ता खेड यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे कारचालक पवार हा आपल्या ताब्यातील एक्स यु व्ही ३०० गाडी नं एम एच ०८ ए एक्स ३४४७ हा मुंबई ते चिपळुण घेवुन जात असताना शिवफाटा रस्त्याच्या पलिकडे मुंबई गोवा महामार्गावर चिपळुण कडे जाणारे रोडवर फिर्यादी यांचे सख्खे चुलते राजाराम गणपत काणेकर हे शिवफाटा स्टॉपकडे घरी जाण्याकरिता रस्ता ओलांडत असताना कारने ठोकर दिली यात ते गंभीर जखमी झाले होते जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तसेच कमरेला, डाव्या पायाला व उजव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा बिपी लो होवुन त्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी कार चालक पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे