रत्नागिरी | प्रतिनिधी : दुचाकी रस्त्यात लावून दुचाकीवरुन उतरलेल्या महिलेला अचानक चक्कर येऊन ती रस्त्यावर पडली. तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला.
श्रावणी सुधीर गोवळकर (४३, रा. मुरुगवाडा पांढरा समुद्र, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना सोमवार २५ मार्च रोजी रात्री 9.45 वा.सुमारास आरे पुलावर घडली. सुधीर गोवळकर हे गाडी बाजूला लावत असताना त्यांच्या पत्नीला अचानक चक्कर आली आणि ती रस्त्यावर पडल्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान मंगळवार २६ मार्च रोजी रात्री 9.45 वा.सुमारास तिचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











