२ व ३ एप्रिल रोजी “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपट मोफत दाखविला जाणार

राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड चे आयोजन
*कणकवली,देवगड,चित्रपटगृह दुपारी १२ चा चित्रपट दाखविला जाणार

कणकवली;
राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ देवगड,सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने “स्वातंत्र्यवीर सावरकर” चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक मंगळवार 2 एप्रिल व बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी ठीक 12 वाजता हा मोफत चित्रपट दाखविला जाणार आहे.
लक्ष्मी चित्रमंदिर,कणकवली आणि स्टार लाईट चित्रपटगृह,देवगड येथे हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यवा असे आवाहन करण्यात आले आहे.