नातूनगर मध्ये घरातून सिलेंडर चोरीस, अज्ञातावर गुन्हा

खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील नातूनगर येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने एचपी कंपनीचा  लोगो असलेला भरलेला गॅस सिलेंडर चोरून नेल्याची विचित्र घटना २२ मार्च रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघड झाली या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी  राजेंद्र मनोहर लोहार,वय-५८ यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. लोहार हे घरात झोपले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या वरंड्यामध्ये अनाधिकृत प्रवेश करुन ४०७० रुपये किमतीचा एचपी कंपनीचा भरलेला गॅस सिलेंडर चोरुन नेला.