उभादांडा येथील हॉटेल गोलवन ला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

 

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

वेंगुर्ले l दाजी नाईक :उभादांडा येथील हॉटेल गोलवन ला दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये हॉटेल जळून खाक झाले असून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

आग लागल्याचे समजतात कर्मचाऱ्यांनी वेंगुर्ले नगरपंचायत ला कळविले. मात्र नगरपरिषदेचा बंब नादुरुस्त असल्याने लहान पाणी टँकरने आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तो पर्यंत सावंतवाडीचा अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.

उभा दांडा किनाऱ्यावर हॉटेल असल्याने वाऱ्याच्या वेगाने आग वाढत होती. मात्र तरीही आग विजवण्याचे प्रयत्न सुरू होते.

हॉटेलमधील फर्निचर टेबल खुर्च्या फ्रिज जळून खाक झाले आहेत.