प्रशासनाला दाखले प्राप्त; ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत
खेड (प्रतिनिधी) उन्हाच्या काहिलीने उपलब्ध जलस्त्रोत आटत चालल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. टँकरच्या पाण्यासाठी ७ गावातील १३ वाड्यांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल करूनही दाखले प्राप्त न झाल्याने ग्रामस्थ टँकरच्या प्रतीक्षेत होते. अखेर दिवाणखवटी सातपानेवाडीसह सुसेरी-देवसडे येथील ५ वाड्यांचे दाखले प्रशासनाला प्राप्त झाल्याने ८ एप्रिलपासून याच वाड्यांमध्ये तालुक्यातील पहिला टँकर धावणार आहे. उर्वरित ४ गावातील ७ वाड्यांना टँकरच्या पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरवर्षी तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच पाण्याचा पहिला टँकर धावतो. यावर्षी मात्र जलजीवन मिशन योजनां सह बांधण्यात आलेल्या २१३ मिशन बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा उपलब्ध झाला. यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई लांबणीवर पडल्याने प्रशासनासह ग्रामस्थांना दिलासा मिळाला होता. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यातील खोपी-वकिरेवाडी, मानेवाडी येथील ग्रामस्थांचा टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे पहिला अर्ज दाखल झाला होता. यानंतर एकापाठोपाठ एक सुसेरी- देवसडे येथील सावंतवाडी, वैरागवाडी, जाधववाडी, बौद्धवाडी,मधलीवाडी, कुळवंडी-शिंदेवाडी, दिवाणखवटी – सातपानेवाडी व कशेडी येथील २ वाड्यांचेही टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल झाले होते. यामुळे ऐन शिमगोत्सवात ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले होते. मात्र एप्रिल उजाडूनही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाल्याने तहानलेल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी रणरणत्या उन्हातून भटकंती करत तहान शमवावी लागली होती
शिमगोत्सवासह सलग सुट्ट्यांमुळे शासकीय कार्यालये बंद होती. यामुळे प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबतचे दाखले मिळण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यासाठी महिनाभर प्रतीक्षा करावी लागली होती. अखेर दिवाणखवटी-सातपानेवाडी व सुसेरी- देवसडे येथील सावंतवाडी, वैरागवाडी, जाधववाडी, बौद्धवाडी, मधलीवाडी येथील दाखले प्रशासनाला प्राप्त झाल्याने टँकरने ८ एप्रिलपासून या ठिकाणी तालुक्यात पहिला टँकर धावणार आहे. उर्वरित गा वाड्यांचे अर्ज प्राप्त होताच त्यांनाही टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्यचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे. गटविकास अधिक यशवंत भांड यांच्या मार्गदर्शनाखाली प विभागातील कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
शासकीय टँकर दुरूस्तीला
तालुक्यात टंचाईग्रस्त गाव वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसू लागल्याने प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. त्यानुसार गेले वर्षभर उभा असलेला शासकीय टँकरही दुरूस्तीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









