पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकलेल्या यादीत आपला हक्काचा खासदार हवा – निलेश राणे

चित्र फार छान दिसतेय, पण तरीही गाफील राहू नका

राजापूर | प्रतिनिधी : विकासापेक्षा आपला स्वार्थ साधणाऱ्या आणि गेल्या दहा वर्षात कोणतेही विकासात्मक काम न करणाऱ्या खासदाराला आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे. भविष्यात आपल्या हे चित्र बदलायचे असून आपला हक्काचा माणूस खासदार म्हणून लोकसभेत पाठवायचा आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिंकलेल्या यादीत आपला माणूस असायलाच हवा या जिद्दीने कामाला लागा असे आवाहन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केले.
ही लोकसभा निवडणूक ही मोदींची निवडणूक आहे. चित्र फार छान दिसतेय पण तरीही गाफील राहू नका, आपल्याला आपल्या हक्काचा खासदार लोकसभेत पाठवायचा आहे याचा विसर पडू देऊ नका. त्यासाठी पुढील काही दिवस झपाटून काम करा असे निलेश राणे म्हणाले,. केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओणी येथे झालेल्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात निलेश राणे बोलत होते.

या मतदार संघातील लोकसभा निवडणूकीचा आपल्याला चांगला अनुभव आहे. त्यामुळे कुठलीही निवडणूक असो ती निवडणूक म्हणूनच लढवायची आहे. शिवसेना एकत्र असताना अपक्ष म्हणून या मतदार संघाने मला मोठे पाठबळ दिले. त्यामुळे या निवडणूकीतही महायुतीच्या उमेदवारा आपल्याला मोठया मताधिक्क्याने निवडून आणावयाचे आहे असेही राणे यांनी नमुद केले.

विद्यमान खासदारनी नेमके या राजापुरसाठी काय केले. आलेल्या प्रकल्पनां विरोध केला , नुकसान इथल्या तरुणांचे झाले आणि फायदा मात्र राजन साळवी यांचा झाला ते आमदार झाले. राऊत खासदार झालेत. पण त्यानंतर इथल्या लोकांसाठी काय केले. प्रकल्पांना विरोध केला, इथल्या माता भगिनींना भडकवले, इथून रोजगार गेला, आजपर्यंत या आमदार व खासदारांनी स्थानिकांना रोजगार मिळवून दिलेला नाही . जनतेचा विरोध असेल तर आपण कायमच जनतेसोबत असू असे आपण वारंवार सांगितले होते. मग जैतापूर असो की रिफायनरी असो. आपण कधीच राजकिय लाभासाठी विरोध केला नाही. पण केवळ राजकिय स्वार्थ साधण्यासाठी उध्दव ठाकरे व त्यांचा कंपू अशा प्रकल्पांना विरोध करतात हे वारंवार पुढे आले आहे असे देखील राणे म्हणाले. विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासह आमदार राजन साळवींवर जोरदार टिका केली . मागील दहा वर्षात केवळ मते घेण्याचेच काम त्यान्नी केले . विकास कामे न करता विकासाला विरोध करण्याचे काम त्यान्नी केले. सुमारे तीन लाख कोटींचा रिफायनरीप्रकल्पाला विरोध करुन विरोधकान्नी कोकणचे आतोनात नुकसान केले .केवळ विरोध करणे चुकीची माहिती पसरवुन जनतेची माथी भडकावणे हेच धंदे असल्याचा टोला त्यांनी लगावला.

आज इथे अनेक गावे ओसाड पडली आहेत, ज्यांनी सुखी जीवनाची स्वप्ने पाहिली ते रोजगाराच्या शोधात निघून गेले आहेत, आज दाखवण्यासारखे राजापुरत काहीच नाही. अगदी बाजु बाजुला असलेल्या कणकवली आणि राजापूर या दोन तालुक्याचा विचार केला तर बघा किती फरक दिसतो, तीथे विकास झाला, ३०० बचत गटांच्या माध्यमातुन महिलांना रोजगार मिळतो आणि राजापुरात मात्र काहीच होत नाही. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे हे लक्षात ठेवा आणि काम करा असे आवाहन राणे यांनी केले.

मी कायमच जनतेसोबत राहिलो, कोणताही प्रसंग असो साथ दिली. प्रसंगी सत्तेत असूनही विरोधात जाऊन जनतेसाठी लढलो, राजापूरातील हातिवले टोल सुरु होताना स्थानिकांच्या बाजूने उभे राहिलो, सवर्पक्षिय आंदोलनात पुढे राहून विरोध केला तेव्हा स्थानिक खासदार व आमदार तिथे नव्हते, मात्र राणे साहेबांनी एका फोन केला आणि टोल बंद केला. आणि हा खासदार टोलचा ठेका घेतो. जनतेची अशी असंख्य कामे आम्ही भाजपच्या माध्यमातुन करतो.

त्यामुळे आता चुकीच्या माणसाला निवडून देऊ नका, इथली मुले इथली पिढी बरबाद होता कामा नये, आज वयाची सत्तरी ओलांडली तरीही केवळ कोकणच्या, इथल्या देणे फेडण्यासाठी ते कायम तत्पर आहेत. आता उध्दव ठाकरे, विनायक राऊत, राजन साळवी यांच्याकडे देण्यासाठी काहीही नाही. त्यांच्या कुठल्याही आश्वासनाला बळी पडू नका असे आवाहन राणे यांनी केले.