शिरगाव ( प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या भारत रत्न डाॅ.एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध परीक्षेत केंंद्र शाळा साळशी नंबर १ च्पा विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
शेठ म ग हायस्कूल देवगड येथे १७ मार्च २०२४ मध्पे घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी केंंद्र शाळा साळशी या प्रशालेतील इ.चौथी मधील पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील लक्ष्मी गावकर (१५६ गुण), श्रेयस साळसकर (१३४ गुण), रुतिका साटम (१२२ गुण) मिळवून या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
या विद्यार्थ्यांना या प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर कदम, पदवीधर शिक्षक संतोष मराठे,उपशिक्षिका हेमलता जाधव,वर्गशिक्षका स्मिता कोदले या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे साळशी सरपंच वैशाली सुतार,उपसरपंच कैलास गावकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष साळसकर,उपाध्यक्षा त्रिशा गावकर व सर्व सदस्य, सर्व शिक्षक वर्ग,ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले आहे.












