खेड कोकण रहिवासी मंचतर्फे २७ पासून क्रिकेट स्पर्धा

खेड(प्रतिनिधी) तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहराच्यावतीने २७ व २८ एप्रिल रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत १२ संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्यास ३३,३३३ रूपये, उपविजेत्यास २२.२२२ रूपये व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर यांनाही गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशाल देवळे, संदेश कदम, नागेश कदम, संतोष निकम, महेंद्र पाष्टे, हरेश लाड यांच्यासह कोकण रहिवाशी मंचचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.