मा.पं.शि.प्र.मंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल येथे,संस्थेच्या कार्यकारी मंडळावर नवीन संचालक मंडळावर निवडून आलेल्या संचालकांचे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे तर्फे स्वागत करण्यात आले.

यावेळी शिक्षक प्रतिनिधी विठ्ठल भोईर व शिक्षकेतर प्रतिनिधी संतोष मोहिते यांनी बुके देत मंडळाचे स्वागत केले व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तर प्रत्येक संचालकांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.दत्तात्रय बापट, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर, सचिव सुभाष सहस्त्रबुद्धे, खजिनदार हनिफ म्हाते,मनोज शिंदे, संजय सहस्त्रबुद्धे,दीपक शिगवण,आदी संचालक उपस्थित होते.यावेळी सचिव सुभाष सहस्त्रबुद्धे, उपाध्यक्ष शशिकांत घाणेकर यांनी मनोगते व्यक्त केली.तर शाळेकडून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोगते व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.