RATNAGIRI: हातखंबा भाईशेठ मापुस्कर कॉलेजचा निकाल 98.46 टक्के

Hatkhamba Bhaisheth Mapuskar College result 98.46 percent

रत्नागिरी : हातखंबा येथील श्रीकांत उर्फ भाईशेठ मापुस्कर आर्ट्स कॉमर्स संयुक्त ज्युनिअर कॉलेजचा निकाल 98.46% लागला असून इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. ही परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या काळात झाली होती. परीक्षेस एकूण 65 विद्यार्थ्याची नोंदणी केली. त्यातील 64 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती प्रा. सुभाष रानमाळे यांनी दिली.

ज्युनिअर कॉलेजचा सरासरी निकाल 98.46% लागला असून कला शाखेचा निकाल 97.67% लागला. तर वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला आहे. तसेच वाणिज्य शाखा निकालात यंदाही आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. यंदा प्रत्यक्ष नियमित पद्धतीने परीक्षा झाल्याने निकालाची उत्सुकता सर्व विद्यार्थ्यांना लागली होती. काहीसा राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर अडथळा निर्माण होत असल्याने निकालाची प्रतीक्षा करावी लागेल, ही भीती गुरुवारी (25 मे 2023) विद्यार्थ्यांमध्ये निकाल पाहताना दिसली. मात्र कोणताही अडथळा न येता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता आला.

कला शाखेत समीक्षा दत्ताराम सनगरे हिने 75.17% गुण मिळवून प्रथम क्रमांक, दिशा दिलीप गुरव-439/600 73.17% द्वितीय, तर अमिषा अनिल कळंबटे 72.83% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच वाणिज्य शाखेत प्रज्वल गणपत होरंबे 84.17% गुण मिळवून प्रथम, मंजिरी संतोष गुरव 70.50% द्वितीय तर वरद नामदेव कळंबटे 70.33% मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे ज्युनिअर कॉलेजच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनींना विशेष करून प्रा. सुभाष रानमाळे, प्रा. अनिता पाटील, प्रा. मनस्वी जाधव व प्रा. सिद्धेश कळंबटे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रशालेचे प्राचार्य व्ही जी परीट सर स्थानिक सल्लागार समितीचे चेअरमन श्री सुनीलदत्त उर्फ आप्पा देसाई शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री अण्णा शेठ जठार माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ.श्रिया खानविलकर यांचे प्रोत्साहन लाभले.