तिसंगी पिंपळवाडीमध्ये दोन धाडी; ५ लाख २४ हजार रुपयांचा गावठी हातभट्टीची दारूचा साठा जप्त

खेड (प्रतिनिधी) : तालुक्यातील तिसंगी- पिंपळवाडी येथील जंगममय भागातून खेड पोलीसांनी  दोन ठिकाणी धाड टाकून ५  लाख २४ हजार रुपये किंमतीचा गावठी हातभट्टीची दारू निर्मितीकरिता लागणारा गैरकायदा बिगरपरवाना साठा जप्त करण्यात आला .
या प्रकरणी रोशन सुभाष भोसले, विशाल जयंत भोसले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई  ७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ : ३० वाजताच्या  सुमारास करण्यात आली. गावठी हातभट्टीची दारू निर्मितीकरीता लागणारे गूळ, नवसागर मिश्रित कुजके रसायन, लोखंडी टाकी, सिंटेक्सच्या टाक्या , प्रोव्हि माल असा २ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा गैरकायदा बिगरपरवाना साठा करून ठेवलेल्या स्थितीत मिळून आला असून यामध्ये  गूळ नवसागर मिश्रित गूळ नवसागर तयार केलेले कुजके रसायन,  प्लास्टिकच्या  सिंटेक्सच्या टाक्या आदी साहित्य जप्त करण्यात आले