आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रम
खेड(प्रतिनिधी) : महामानव, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ स्थानिक व मुंबई यांच्या वतीने खेड शहरातील जिजामाता उद्यान येथे आयोजित करण्यात आली असून या निमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे डॉ आंबेडकर यांना अभिवादन करण्या साठी तालुक्यातील विविध गावातून नागरिक दाखल होणार असल्याने जनसागर उसळणार आहे.
जयंती च्या पूर्व संध्ये ला खेड शहरातुन अभिवादन पर कँडल मार्च काढण्यात येणार आहे १४ रोजी सकाळी १०.३० वाजता धम्म ध्वजारोहण तालुकाध्यक्ष राजरत्न तांबे यांच्या हस्ते बुद्ध पूजा पाठ व त्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची खेड शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने भोजनदान, त्या नंतर २ ते ५ जाहीर सभा होणार असून प्रा के एस सावरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
रात्री ९.३० वाजता प्रसिद्ध गायक प्रेम धांदे आणि पार्टी विरुद्ध वैशाली आणि किरण पार्टी यांचा सामाजिक प्रबोधन पर कव्वाली चा जँगी सामना होणार आहे या उत्सवात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन खेड तालुकाध्यक्ष राजरत्न तांबे, मुंबई अद्यक्ष संघराज तांबे, यांनी केले आहे.











