पोलीस शिपाई चालक पदाची रविवारी लेखी परीक्षा

Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती २०२१ मधील पोलीस शिपाई चालक पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दि. २६ मार्च रोजी सकाळी ८-३० वा. कुडाळ येथील संत राऊळ महाराज काॕलेज या केंद्रावर घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र हे ‘महाआयटी’ मार्फत आॕनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी दोन तास अगोदर पोहोचणे आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचण, समस्या असल्यास उमेदवारांनी पोलीस नियंत्रण कक्ष ०२३६२- २२८६१४ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.