सातार्डा गावचे माजी सरपंच व्यकंटेश मांजरेकर यांची आत्महत्या

Google search engine
Google search engine

सातार्डा । प्रतिनिधी : सातार्डा गावचे माजी सरपंच व्यंकटेश शांबा मांजरेकर ( ८९, रा. तरचा वाडा) यांनी बुधवारी पहाटे घरासमोरील फणसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लाऊन आत्महत्या केली. अनेक उपचारानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने व डोळ्यांनी दिसत नसल्याने मांजरेकर यांनी वैतागून आत्महत्या केल्याचे समजते. व्यंकटेश मांजरेकर यांनी तीन ग्रामपंचायत निवडाणुकांमध्ये निवडून येत तब्बल बारा वर्षें सातार्डा सरपंचपद भूषविले होते. गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले होते. सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये तसेच गावातील वडीलधाऱ्यांमध्येही त्यांच्यात मानाचे स्थान होते. दरम्यान, गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्या डोळ्यांवर उपचार सुरु होते. दोन्ही डोळ्यांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली होती. महागडे उपचार त्यांच्या डोळ्यांवर सुरु होते असे कुटुंबियांनी सांगितले. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना अस्पष्ट दिसत होते. डोळ्यांनी दिसत नसल्याने वैतागून व्यंकटेश मांजरेकर यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

आत्महत्या केल्याची खबर त्यांचा मुलगा महेंद्र मांजरेकर यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील , पोलीस श्री परब, श्री मातोंडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, दोन मुलगे, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील सातार्डा मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर यांचे ते वडील होत.