खेड (प्रतिनिधी) बेळगाव निवासी आई श्री कलावती देवी यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ते १४ एप्रिल या कालावधीत, सोनारआळीतील श्री विठ्ठल मंदिरात सकाळी ६ ते ७ बालोपासना सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील सिद्धकला भजन मंडळाच्यावतीने आयोजित सप्ताहात बालोपासनेसह कथाकथन केले जाणार आहे.. सकाळी ७ ते ८.३० यावेळेत भजन, सायंकाळी ४ ते ५.३० वाजता सायंस्मरण भजन, फक्त रविवारी रात्री ९ ते १० यावेळेत नित्योपासना, सकाळी ७ ते ८.३० यावेळेत भजन व बालोपासना घेतली जाईल.











