डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मंडणगड l प्रतिनिधी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड, मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .सर्वप्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी दीप प्रज्वलन करून, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उपमुख्याध्यापक श्री.अर्जुन हुल्लोळी व पर्यवेक्षक श्री. शांताराम बैकर ,ज्येष्ठ शिक्षिका सौ.योजना शेट्ये ,शिक्षक प्रतिनिधी सौ. स्वरा देवघरकर ,विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी ओवी चोरगे व विद्यार्थी प्रतिनिधी सागर मर्चंडे यांनी अगरबत्ती प्रज्वलित करून प्रतिमेला पुष्प अर्पण केली.

यानंतर प्रशालेतील शिक्षक श्री. किशोर कासारे यांनी आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असे सांगितले. त्यानंतर शिक्षक श्री. प्रभाकर भालके व श्री. सुनील घोसाळकर यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन कार्य सांगितले.

त्यानंतर उप मुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोठेपण सांगताना, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले यातच त्यांचे मोठेपणा आहे. असे सांगितले.

शेवटी आदरणीय मुख्याध्यापक श्री. विजय खाडे यांनी आपले विचार मांडताना, राष्ट्रपुरुषांचे विचार हे एक दोन शब्दांमध्ये मांडता येत नाही; तर ते आपण अंगीकारले पाहिजेत. महिलांनी इतर आदर्शांची पूजा करण्यापेक्षा ,आपल्याला मार्ग दाखवणाऱ्या आपली उन्नती करणाऱ्या, व आपले जीवन उज्वल करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाईंच्या प्रतिमा घराघरात लावून ,त्यांचे पूजन केले पाहिजे .असे सांगितले.

श्री.किशोर कासारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.