दहा ठिकाणी केलेल्या कारवाईत दोन हजार दारू बॉटल जप्त ; सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल ताब्यात
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील अवैध दारू साठा व विक्रीवर मालवण पोलिसांनी धडक कारवाई करत मागील 20 दिवसांमध्ये 10 ठिकाणी छापे टाकले. एकूण 2000 दारू बॉटल जप्त करत सुमारे 2 लाख 4 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मालवण तालुक्यात गोवा बनावटीची दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून पोलिसांनी 16 मार्च ते 10 एप्रिल कालावधीत छापेमारी केली. मालवण शहर व तालुक्यात अन्य ठिकाणी कारवाई केली. यात गोवा बनावटीची दारू आढळून आली. पोलिसांच्या धाडसत्रामुळे अनधिकृत दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले. ही कारवाई उपनिरीक्षक श्री. यशवंते, प्रतिज्ञा खोत, संतोष नांदोसकर, एस एस खाडे, हेमंत पेडणेकर, विलास टेंबुलकर, सुशांत पवार, प्रकाश पवार, सुभाष शिवगण, वृषाली पाटील, धोंडू जानकर, महादेव घागरे यांनी केली.












