इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत केंंद्र शाळा साळशी नं १ च्या विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व यश.  

 

राज्य गुणवत्ता यादीत राघव गावकर याचा दुसरा क्रमांक तर नैतिक लब्दे याचा पाचवा क्रमांक 

शिरगाव (प्रतिनिधी)       देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा साळशीचे २ विद्यार्थी राज्य गुणवत्ता , ६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता तर ६ विद्यार्थी केंद्र गुणवत्ता यादीत आले आहेत.

 

इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत केंद्रशाळा साळशी नं १ या प्रशालेतून २० विद्यार्थी बसले होते,त्यापैकी इयत्ता पहिली मधील राघव निलेश गावकर याने (२०० पैकी १९८ गुण ) मिळवून राज्यात दुसरा क्रमांक तर नैतिक केशव लब्दे याने (२०० पैकी १९२ गुण ) मिळवून राज्यात पाचवा क्रमांक पटकावला. तसेच इयत्ता पहिली मधील निधी मिराशी हिने (२०० पैकी १८२ गुण ) मिळवून जिल्ह्यात चौथी , आयुषी वरेरकर हिने (२०० पैकी १७२ गुण ) मिळवून जिल्ह्यात नववी , अमेय कुंभार याने (२०० पैकी १६६ गुण )मिळवून केंद्रात पहिला , भक्ती मिराशी हिने (२०० पैकी १६४ गुण )मिळवून केंद्रात दुसरी , साची लाड हिने (२०० पैकी १४२ गुण)मिळवून केंद्रात तिसरी आली.तसेच इयत्ता दुसरी मधील पूर्वा पारकर हिने (२०० पैकी १९० गुण ) मिळवून जिल्ह्यात पहिली, पार्थ लब्दे याने (२०० पैकी १८४ गुण ) मिळवून जिल्ह्यात चौथा , सांची साळसकर हिने (२०० पैकी १७८ गुण ) मिळवून जिल्ह्यात सातवी , आदिनाथ गावकर याने (२०० पैकी १६४ गुण ) मिळवून केंद्रात पहिला आला. इयत्ता तिसरी मधील ईश्वरी गावकर हिने (३०० पैकी २०२ गुण ) मिळवून केंद्रात तिसरी तर इयत्ता पाचवी मधील कौस्तुभ गावकर याने (३०० पैकी २४८ गुण ) मिळवून जिल्ह्यात चौथा व पारस वरेरकर याने (३०० पैकी २१२ गुण ) मिळवून केंद्रात पहिला येण्याचा मान मिळवला. उर्वरीत सर्व विध्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत.

 

या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख व प्रशालेचे मुख्याध्यापक गंगाधर कदम , पदवीधर शिक्षक संतोष मराठे, वर्गशिक्षिका हेमलता जाधव व वर्गशिक्षिका स्मिता कोदले यांचे मार्गदर्शन लाभले.

विध्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सरपंच वैशाली सुतार मॅडम , उपसरपंच कैलास गावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष साळसकर, उपाध्यक्षा त्रिशा गावकर व सर्व सदस्य, सर्व शिक्षक ,पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.