राजापूर / प्रतिनिधी : राजापूर एलआयसी ऑफ इंडीया शाखा 94 आर या शाखेमध्ये एलआयसी एजंट म्हणून कार्यरत असलेल्या शिल्पा धनंजय मराठे यांनी गतवर्षी एमआरडी हा बहुमान मिळविलेला असताना आता कोल्हापूर विभागामध्ये सीओटी (कोर्ट ऑफ दी टेबल) होणार्या पहिल्या महिला एजंट म्हणूनही त्यांनी बहुमान पटकाविला आहे. एका दिवसामध्ये नॉन सिंगल प्रिमीयम देत सौ. मराठे यांनी हा बहुमान पटकाविला असून त्यांनी केलेल्या या लक्षवेधी कामगिरीमुळे कोल्हापूर विभागामध्ये एका दिवसामध्ये नॉन सिंगल प्रिमीअम देण्याचा कोल्हापूर विभागामध्येही पहिल्यांदाच प्रकार घडला आहे. सीओटी होण्याचा बहुमान मिळविल्याबद्दल सौ. मराठे यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
एलआयसीच्या कोल्हापूर विभागामध्ये कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांचा समावेश असून त्यामध्ये अठरा शाखांचा समावेश आहे. राजापूर शाखे अंतर्गत 184 एजंट, सहा एमडी आर टी एजंट 2024, तर एक सीओटी 2025 असे एजंट कार्यरत आहेत. राजापूर शाखेअंतर्गंत कार्यरत असलेल्या सौ. मराठे यांनी वर्षभराच्या कालावधीमध्ये एक कोटी 33 लाख नॉन सिंगल प्रिमीयम डिव्हिजनमध्ये पॉलिसी रूपात आणात संपूर्ण कोल्हापूर विभागामध्ये तिसरा क्रमांक पटकाविला. तर, नॉन सिंगल प्रीमियम देत त्यांनी विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. दांडगा जनसंपर्क आणि विश्वासार्हतेच्या जोरावर एलआयसी एजंट म्हणून सातत्याने यशस्वी अन् लक्षवेधी कामगिरी सौ. मराठे यांनी सीओटी (कोर्ट ऑफ दी टेबल) होण्याचा बहुमान पटकाविल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. सामाजिक, सहकार आणि राजकीय अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत राहूनही एलआयसी क्षेत्रामध्ये पहिल्या महिला सीओटी होण्याचा बहुमान पटकाविल्याबद्दल सौ. मराठे यांचा एलआयसीच्या राजापूर शाखेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. सत्कार केल्याबद्दल सौ. मराठे यांनी सार्यांना धन्यवाद देताना राजापूरसारख्या छोट्या शहरामध्ये कार्यरत राहून आपण मिळविलेल्या सीओटी बहुमानातून प्रेरणा घेत अन्य सहकारी एलआयसी एजंट यांनी अशा स्वरूपाचे लक्षवेधी यश संपादन करावे असे मत व्यक्त केले.











