वेंगुर्ले : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयातील इयत्ता आठवीतील तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. त्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातून एकूण अकरा विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते. त्यापैकी सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले व तीन विद्यार्थी यांची गुणवत्ता यादीत निवड झाली असून ते शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत. यामध्ये कुमारी वैदेही प्रसाद पवार ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात पाचवी आली. कुमारी संस्कृती सुदेश चीपकर ही ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात सातवी तर कुमारी गाथा दत्ताराम कोळंबकर एस बी सी प्रवर्गातून जिल्ह्यात दुसरी आली आहे. यश प्राप्त विद्यार्थ्यांचे तसेच त्यांचे पालक, मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळा संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.












