खेड (प्रतिनिधी) मुरडे-रामवाडी ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरूण विकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १७ एप्रिल याकालावधीत रामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता रामवाडी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन, १० वा. घटस्थापना, सायंकाळी ७ वा. हरिपाठ व आरती, रात्री ९ वा. मुरडेतील रमेश गुहागरकर यांचे भजन, १६ रोजी दुपारी १२.३० वा. खेमनाथ मंदिर येथे सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ७ वा. हरिपाठ व आरती, रात्री ९ वा. कळंबणीतील गणेश महाराज शिगवण यांचे कीर्तन, रात्री ११.३० वाजता लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, १७ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत श्रीराम जन्मसोहळा व पाळणा, चाकाळेतील सतीश सकपाळ यांचे भजन व कीर्तन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. सत्यनारायणाची महापूजा, ७ वा. हरिपाठ, रात्री ८ वा. आरती, ९.३० वा. स्थानिक भजन, १० वा. पालखी मिरवणूक, ११ वा. बक्षीस वितरण, ११.३० वाजता वगनाट्य होणार आहे.










