खेड(प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचघर-रेवेचीवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून ४ हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी दिनेश नारायण सुर्वे याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. चिंचघर-रेवेचीवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. या धाडीत ४ हजार रूपये किंमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बांगर यांनी तक्रार नोंदवली.












