खेड | प्रतिनिधी : मुंबई गोवा महा मार्गावरील भरणे काळकाई मंदीराचे पुढे भरणे ओव्हर ब्रीज चे नजीक उभ्या ट्रक ला ट्रेलर ने धडक देऊन अपघात केल्या प्रकरणी ट्रेलर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा अपघात १३ रोजी पहाटे ३.३० वाजता घडला होता
निलेश गुलाबचंद चव्हाण (वय २७ वर्षे रा. दयालपुर मु.पो. गंभीरपुर ता. निझामाबाद जि. आझमगड उत्तर प्रदेश, सध्या रा. ट्रान्सकेअर ईएफसी ग्रुप पलास्पा फाटा पनवेल जि. रायगड) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. तर काशीराम सुभाष गुरामदार (वय- ३६ वर्षे व्यवसाय चालक/मालक रा. पंडीत दिनदयाल उपाध्याय नगर जाफ्राबाद सिंदगी ता.जि. गुलबर्मा राज्य कर्नाटक) यांनी तक्रार दिली.
ट्रक हा भरणे काळकाई मंदीराचे पुढे भरणे ओव्हर ब्रीजचे मागे एअर कॉम्प्रेसर येत नसल्याने उभा केलेल्या ट्रकला अचानक पाठीमागुन जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला होता.












