मळदेवाडीत श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

संदेश जिमन l संगमेश्वर :श्रीराम मंदिर मौजे मळदेवाडी, पो. कळंबस्ते, ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. येथे या वर्षी ४० वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा चैत्र शुक्ल नवमी बुधवार दि. १७ एप्रिल २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

श्रीराम जन्मोत्सव निमित्त श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट गेली ३९ वर्ष विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम करत असते . या वर्षी सुद्धा दिवसभर विविध कार्यक्रमांची योजना केली आहे.

पहाटे ४ वाजता काकड आरतीने कार्यक्रमाची सुरवात होईल त्यानंतर सकाळी रामरक्षा, भजन, प्रवचन व दुपारी १२ वाजता श्रीराम ललाचा जन्म; त्यानंतर मंदिर प्रदक्षिणा , महाप्रसाद , लहान मुले व महिलांचे कार्यक्रम सायंकाळी ६:३० वाजता हरिपाठ त्या नंतर कीर्तन व रात्री बहुरंगी नमन अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची योजना श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट मार्फत करण्यात आली आहे ,

तालुक्यातील सर्व मान्यवर व भाविक बंधू भगिनींनी उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित करावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.