चोरद नदीपात्रातील पाणी दूषित व स्थनिक प्रशासन व जिल्हा प्रशासनचे दुर्लक्ष

खेड(प्रतिनिधी) खेड आंबवली मार्गावर व भरणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या चोरदनदी पात्रातून गाववाद्यांना पाणी पुरवठा स्थानिक प्रशासन कडून केला जातोय,पण महसूल प्रशासनचा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे,असा आरोप युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव  सागवेकर यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे केला आहे.
याच नदीपात्रात मोट मोठी वाहने गुरे कपडे धुण्याचे प्रकार सातत्याने चालु आहेत याकडे महसुल प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत भरणे हे जाणूनबुजून दुर्लक्ष करित आहेत तसे न करता याकडे आवर्जून लक्ष केंद्रित केले पाहिजे, नदीचे गाववाद्यांना पाणी पुरवठा केला जातोय,चोरद नदीपात्रात हे शासनाने राखीव जागा म्हणून ठेवले आहे,सद्याच्या स्थितीत पाणी टंचाई ग्रस्त गावांना व वाद्यांना पुरवठा होतोय,मात्र दूषित पाणी पिण्याची वेळ टंचाईग्रस्त गाववाड्यांतील ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे,या सर्व प्रकरणाची गंभीर दखल देऊन गाड्या धुनाराऱ्यांवर योग्यती कार्यवाही करावी असे सुकीवली गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे म्हटले आहे.