कोकण मार्गावर ५ रेल्वेगाड्यांना विलंब

खेड (प्रतिनिधी)कोकण मार्गावरून धावणाऱ्या ५ रेल्वेगाड्या मंगळवारी विलंबाने रवाना झाल्या. कोईमतूर-

जबलपूर स्पेशल २ तास उशिराने रवाना झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली.

 

सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे, तर मडगाव-एलटीटी एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे उशिराने पोहचली. गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, तर निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास २० मिनिटे उशिराने मार्गस्थ झाली. उर्वरित सर्व रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत रवाना झाल्या.