मालवण वायरी येथील श्री देवी केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव
उद्याही विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
अमित खोत | मालवण : मालवण वायरी येथील कुलस्वामिनी श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रौत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह संपन्न होत आहे. सोमवारी श्री केळबाई देवीची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. समस्त मयेकर बंधु मंडळ मुंबई पदाधिकारी, चाकरमानी, स्थानिक तसेच सर्व प्रांतातून आलेले मयेकर बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी संवाद्य मिरवणुकीसह समुद्र स्नानाकरिता देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी व उत्साह दिसून आला. देवीला कलशस्नान व पुजा, त्यानंतर दुपारी महाप्रसाद, मंडळाने डॉ. अनिता आशिष मयेकर मुंबई यांच्या सहकार्याने मंदिरात वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले होते, सायंकाळी श्री सत्यनारायण महापुजा, श्री केळबाई देवी प्रासादिक भजन मंडळ मुंबई बुवा शरद मयेकर आणि सहकारी यांचे भजन, रात्री रेकॉर्ड डान्स असे कार्यक्रम संपन्न होते आहेत.
उद्या होणारे कार्यक्रम
मंगळवारी सकाळी श्री मूर्तीवर पंचामृत अभिषेक व स्नान, होमहवन, रक्तदान शिबीर, महाप्रसाद व ओटी भरणे, सायंकाळी स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम, रात्री आई केळबाई आरती, मंदिरा भोवती पालखी प्रदिक्षणा, रात्रौ दत्त माऊली दशावतार मंडळ दाभोली वेंगुर्ला मालक बाबा मयेकर यांचे दशावतारी नाटक असे कार्यक्रम होणार आहेत.तरी या कार्यक्रम सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन समस्त मयेकर बंधू मंडळ मुंबई (रजि) यांनी केले आहे.












