महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पूणे मार्फत डिसेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा ,वेंगुर्ला विद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रणाली अनंत गवंडे हिने उज्वल यश प्राप्त करून विद्यालयाची NMMS परीक्षेतील यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे.
इयत्ता आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS परिक्षेत कु.प्रणाली अनंत गवंडे हिने obc या प्रवर्गातुन सिंधुदुर्ग जिल्हयात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
सदर विद्यार्थीनीला शासनाची शिष्यवृत्ती प्राप्त झाली असुन. या यशस्वी विद्यार्थीनीस परीक्षा प्रमुख सौ. मनाली कुबल मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केले तसेच या यशस्वी विद्यार्थीनीला श्री दिपक बोडेकर सर
श्री. अजित केरकर यांच्या सह इतर सर्व मार्गदर्शक अध्यापकानी अनमोल मार्गदर्शन केले,
प्रणाली अनंत गवंडे हिचे आणि तीचे पालकांचे व मार्गदर्शक अध्यापक तसेच विशेष मार्गदर्शन करणाऱ्या सौ मनाली कुबल मॅडम यांचे मुख्याध्यापक श्री. उमेश वाळवेकर, संस्था चेअरमन श्री. विरेंद्र कामत आडारकर, संस्था सचिव श्री. रमेश नरसुले, सर्व संस्था कार्यकारिणी सदस्य, पालक शिक्षक संघ सदस्य, विद्यालयीन कर्मचारी वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.












