कापडगाव येथे रामनवमी जन्मोत्सव सोहळा

 

वार्ताहर l पाली :तालुक्यातील कापडगाव बारा कोत्रेवाडी येथील देवस्थान श्रीराम मंदिर येथे बुधवार दि. १७ एप्रिल रोजी ५९ वा श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये श्रीराम अभिषेक जन्मसोहळा, पाळणा, आरती दु. १२.०० वा.श्री राम जन्मोत्सव सोहळा दु. २.३० ते ६ वा. महाप्रसाद सायं. ७ ते ९ वा.भजन, आरती

रात्रौ १०.३० वा. अष्टविनायक कला क्रिडा मंडळ तळवडे, देवरुख यांचे नमन गण गणासुराचे गर्वहरण गौळण पारंपरिक नटखट गौळण,वगनाट्य राजगादीची लालसा अर्थात मृत्युदंड,शाहीर विराज टक्के हे आहेत. तरी सर्व भाविकांनी श्री प्रभूचे दर्शन व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम तरुण मंडळ, कापडगांव, बाराकोत्रेवाडी यांनी केले आहे.