डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मंडणगड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री खाडे सर, उपप्राचार्य हुल्लोळी सर,शिक्षक प्रतिनिधी बिराजदार सर ज्येष्ठ शिक्षक याचावाड सर तसेच इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख श्री केंद्रे सर यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक,शैक्षणिक कार्याचा आढावा श्री खाडे सर,श्री हुल्लोळी सर,श्री भालके सर,श्री बिराजदार सर यांनी घेतला.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांचे नाव अजरामर आहे.लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त करुन देण्याचे कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.स्वातंत्र्य, समता,बंधुता,न्याय ही लोकशाहीची मूलभूत तत्वे भारतामध्ये त्यांनी रुजवली.
आभारप्रदर्शन श्री केद्रे सर यांनी केले.