पाडलोस केणीवाडा मंदिरात श्रीराम नवमी सोहळा ; विविध स्पर्धांचे आयोजन

 

 

बांदा : प्रवीण परब
पाडलोस – केणीवाडा येथील श्री राम मंदिरात बुधवार १७ एप्रिल रोजी श्रीराम नवमी सोहळा साजरा होणार आहे. त्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमा बरोबरच लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्त सकाळी ९ वाजता चित्रकला व निबंध स्पर्धा होईल. चित्रकला स्पर्धा २ ते ६, ७ ते १० आणि ११ ते १५ अशा तीन गटात होईल. निबंध लेखन स्पर्धेत पहिली ते चौथी गटासाठी माझे गाव, माझा आवडता सण आणि आमच्या गावातील जत्रा असे विषय आहेत. पाचवी ते दहावी गटासाठी रामायणातील एक प्रसंग, प्लास्टिक मुक्त भारत आणि छत्रपती शिवाजी महाराज असे विषय देण्यात आले आहेत. अधिक माहिती सिद्धेश कोरगावकर (९८६७८५३१८५) यांच्याशी संपर्क करावा.

दुपारी ११ ते १ दरम्यान श्रीराम जन्म सोहळा, दुपारी महाप्रसाद, ३ वाजता बक्षीस वितरण, ३.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद होईल. संध्याकाळी ६.३० वाजता पुरुष, महिला व लहान मुलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा होईल. रात्री ९.३० वाजता बाळकृष्ण दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केणीवाडा ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.