वेंगुर्ले | दाजी नाईक : महायुतीत खालच्या स्तरावर समन्वय होणे फार महत्वाचे असते. त्यांची मन जुळवण्याच्या दृष्टीने या समन्वय बैठकांचा फार उपयोग होतो. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात शिवसेना आणि भाजप मिळून आम्ही ७० टक्के आहोत. महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज हा १९ तारीखला भरला जाईल. ज्यावेळेला दोन उमेदवार इच्छुक असतात त्यावेळी सगळ्यांची मन राखण यात वेळ जातो. मात्र एकमताने ही निवडणूक लढवून जिंकली जाईल अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), मनसे, आरपीआय या महायुतीतील पक्षांच्या समन्वय बैठका संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यातील पंचायत समिती गटनिहाय संपन्न झाल्या. यावेळी वेंगुर्ले शहराची महायुतीची समन्वय बैठक येथील सप्तसागर अपार्टमेंट येथे संपन्न झाली. यावेळी या बैठकीला उपस्थित शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेश सचिव एम. के. गावडे, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा नियोजन सदस्य दिलीप गिरप, शिवसेना जिल्हा संघटक सुनील डुबळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, भाजप तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुषमा खानोलकर, महिला आघाडी अध्यक्ष सुजाता पडवळ, राष्ट्रवादीच्या प्रज्ञा परब, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, कोस्टल तालुकाप्रमुख काशिनाथ नार्वेकर, शिवसेना महिला तालुका संघटिका प्राची नाईक, तालुका संघटक बाळा दळवी, अल्पसंख्यांक महिला संघटिका शबाना शेख, माजी सभापती सारिका काळसेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, शहरप्रमुख संतोष परब, वसंत तांडेल, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, बाबली वायंगणकर, भूषण आंगचेकर, भूषण सारंग, पप्पू परब यांच्यासाहित महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनिष दळवी, एम के गावडे, बाळू देसाई, सचिन वालावलकर यांनी मार्गदर्शन केले.










