ओटवणे (प्रतिनिधी) सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा जाधववाडी ग्रामस्थ सध्या पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत असून स्वच्छ आणि नियमित पाणी देण्यास ग्रामपंचायत कमी पडली आहे.याबाबत वारंवार लेखी तक्रार देऊनही दुर्लक्ष केलं जात आहे.याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्तरावर ,पंचायत समिती सावंतवाडी या ठिकाणीही जवळपास या वाडीतील २५ ग्रामस्थानी आपला तक्रार अर्ज दाखल केला होता मात्र यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न होता ग्रामस्थांना स्वच्छ पाणी तसेच नियमित पाणी पुरवठा करन्यात यंत्रणा अपयशी ठरली असून यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याशी जीवाशी खेळत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार नळ योजना जाधववाडी साठी करण्यात आली होती मात्र सध्य स्थीतीत यावर अन्य वाडीतील काही कनेक्शन जोडणी केली आहेत याविषयी तीरोडा ग्रामस्थांची तक्रार नाही पण या कारणामुळें जर आपल्या जाधववाडी ला पाण्याच्या गैरसोईला सामोरं जावं लागतं असेल अनियमित पाणी मिळत असेल तर मात्र याविषयी आवाज हा उठविणे गरजेचे असल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन मार्गे याला विरोध करावा लागेल अशा भावना तिरोडा वासियांच्य आहेत, अनियमित पाणी, ठिकठिकाणी असणार लिकेज त्यामुळें वाया जाणार पाणी,स्वच्छ पाणी न मिळणे, यासारखे प्रश्न उद्भवत असून ग्रामपंचायत च्या कामावर ग्रामस्थ नाराज आहेत जर ग्रामपंचायत यंत्रणा प्राथमिक गरजा पुरविण्यासाठी सुध्दा अपयशी ठरत असेल तर याचा आपण जाहीर निषेध करतो अशा संतप्त भावना ग्रामस्थांमधून येत आहेत.
तसेच हा प्रश्न गंभीर असून येणाऱ्या काही दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर नागरिकांच्या रोषाला ग्रामपंचायत यंत्रणेला सामोरं जाव लागेल असा सज्जड इशारा देण्यात येत आहे बाबासाहेबांनी पाण्यासाठी केलेल्या संघर्षाला आज ९०वर्षांहून अधिक वर्षे लोटली तरी सुद्धा त्यांच्या समाजाला आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट असून. या समाजाला संघर्ष नविन नसून येत्या काही दिवसात जर नियमित पाणी पुरवठा न झाल्यास हा पाण्यासाठी चा संघर्ष नक्की पेटणार असा समजच देण्यात येत आहे.












