सावंतवाडी :
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन सावंतवाडी च्या वतीने सालाबादप्रमाणे आयोजित रामनवमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सोम,मंगळ, बुधवारी तीन दिवस रामकथेचे आयोजन करण्यात आले.रामनवमी दिवशी सकाळी १० वाजता भजन, कीर्तन, रामकथा ,१वाजता आरती,व महाप्रसाद देण्यात आला,आलेले भाविक कथा, किर्तनात दंग झाले.

यावेळी सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोंसले तसेच अर्चना घारे परब यांनी इस्कॉन सावंतवाडी सेंटर येथे भेट देऊन सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरे कृष्ण भक्तांनी प्रयत्न केले. पुण्याचे श्रीमान कृष्ण नाम प्रभुजी यांनी रामायणातील प्रसंग वरुन आदर्श राजा,आदर्श पिता, आदर्श पती, म्हणून प्रभु रामचंद्र यांची ख्याती जगभर आहे व भरताची भक्ती, भरत मीलनातुन आपण बंधुप्रेम, कौटुंबिक संबंध व राज्य कारभार कसा करावा याची शिकवण मिळते असे सांगितले कथेचा सर्वांनी लाभ घेतला. इस्काॅन सावंतवाडी च्या वतीने कृष्ण नाम प्रभुजी व आलेल्या भाविकांचे आभार मानले.











