सावंतवाडीतील प्रतीथयश व्यापारी अशोक गुप्ता यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील प्रतिथयश व्यापारी अशोक जगदीशप्रसाद गुप्ता (६९, रा. भटवाडी, सावंतवाडी ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही महिने त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर चारच दिवसांपूर्वी त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले होते. सावंतवाडीतील जानकीबाई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सावंतवाडीतील एक जेष्ठ होलसेल व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध होते. सामाजिक क्षेत्रात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. सावंतवाडीतील प्रसिद्ध चितारआळी गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष होते. तसेच भटवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळाचे देखील ते सल्लागार होते. तसेच सावंतवाडीतील नॅब संस्थेचे देखील ते संचालक होते. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा चेतन, सून, तीन विवाहित मूली, जावई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी आठ वाजता येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.