पाणीटंचाईच्या संकटातुन मुक्तता कधी होणार? नागरिकांचा सवाल
राजापूर | प्रतिनिधी : वाढत्या उष्ण तापमानामुळे भुगर्भातील पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस कमालीच घट होत आहे. राजापूर शहराला नैसर्गिक रित्या पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील साहेबाच्या धरणातील पाण्याची पातळी पुर्णपणे खालावली असून धरणात खडखडाट झाला आहे. त्यामुळे आता राजापूर वासीयांवरिल पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले असून नगर परिषदेकडुन एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता दोन दिवसा आड करण्याची वेळ आली आहे. आता २० एप्रिल पासुन दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती राजापूर नगर परिषद प्रशासनाने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे
गतवर्षी राजापूर शहरातुन वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नद्यांबरोबरच कोदवली येथील साहेबाच्या धरणात मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ उपसण्यात आला होता . त्यामुळे राजापूर शहरवासियाना यावर्षी पाणी टंचाइची झळ कमी प्रमाणात जाणवेल असा कयास होता . मात्र गतवर्षी कमी प्रमाणात झालेला पाउस व सध्या दिवसेंदिवस वाढत जाणारा उष्णतेचा दाह यामुळे पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे .
दिवसेंदिवस खालावत जाणीरी पाणी पातळी पाहता राजापूर नगर परिषदेने २६ मार्च पासुन शहरवासियाना एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली होती . त्यानंतर आता साहेबाच्या धरणात पाण्याचा खडखडाट झाल्याने शनिवार २० एप्रिल पासुन दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे .
रविवार दिनांक २१/०४/२०२४ रोजी पासून दि. २१,२४,२७,३० याप्रमाणे पाणी चालू राहील. चव्हाणवाडी विभाग रुमडेवाडी, शेटये, धालवलकरघाटी, भटाळी वेदशाळा, पंचायत समिती, गोरुले लाईन, कोर्टापासून आंबेडकर वस्तीगृह पर्यंत, यश अपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज, खडपेवाडी, जवाहरचौक, भटाळी, मुल्लावठार, झरीलाईन खान, खलिफे वगैरे काझी, चव्हाणवाडी, परिटघाटी, व्यायामशाळा.
बाजारपेठ विभाग भोगटे लाईन, आशियान बिल्डींग, कुडाळकर लाईन, नाखवा, खतीब, संत रोहिदासवाडी, बौधवाडी, वरचीपेठ, मापारीलाईन मुन्शी नाका ते जवाहरचौक, आकडा मिरजकर घाटी, सनामुल्ला, मुन्नाका तेमान्य लोक मिरजकर बिल्डींग विचार, बावकर, पारकर आनंद, लिगम घाटी, बारगीर, रेस्ट हाऊस, कातारी, मांजरेघाटी, जावकरघाटी, बकर लाईन, बाककर लाईन, साईनगर पुनर्वसन विभाग, सनम लाईन, प्रियदर्शनी नन. २ (मेस्त्री गुरव)
गुरवार दि.२०/०४/२०२४ रोजी पासून दि. २०,२३,२६,२९ याप्रमाणे पाणी चालू राहील. कोंडेतड विभाग बारगीर, काझी अभ्यंकर घरापर्यंत, सातकुट घाटी मोकाशी लाईन, कोंडकर लाईन पर्यंत, वाडीवाले, हवालदार लाईन, मुजावर लाईन, भंडारवाडी, बौध्दवाडी, कुर्ले बठार, कुवेसकर, काझी घरापर्यंत.
तालीमखाना पंप हाऊस / पेट्रोलपंप गुरववाडी, रॉयल कॉम्पलेक्स, चौगुले रेसीडेन्सी इ. रॉयल बिल्डींग, चौगुले रेसिडन्सी, मालीम बिल्डींग, बंगलवाडी गुरववाडी, एस. टी. डेपो, तांबळ गुरववाडी इ. प्रियदर्शनी वसाहत नं. १, एस. टी. डेपो, तांबळ गुरववाडी बंगलवाडी गुरवावाडी, एसटी डेपो खालील गुरववाडी, भाई जाधव, कोर्ट, कचेरी लाईन, पोस्ट, बावधनकर, चौगुले, गवळी, पवार, काझी वैगेरे.
धोपेश्वरघाटी, दिवटेवाडी, खडपेवाडी विभाग तांबे, आरेकर, पवार, डंबे /लाईन, लांजेकर मांड, वकर लाईन, दिवटेलाईन, बाणेपार, गार्डी, राडी, लांजेकर, वादक, दुदम, सोगमलाईन, परांजपे वगैरे साखळकर भंडारवाडी लाईन. १ (२ साखळकरवाडी लाईन) (रहाटे घाटी, पाटकर घाटी, खडपेवाडी), खडपेवाडी / दातारप्रेस / गुजराळी, बागकाझी, भावेवाडा, धुमक लाईन, गोंडाळ लाईन, खालची ओगलेवाडी, वरची ओगलेवाडी, रानतळे विभाग, मुजावर व इतर, रानतळे मुल्ला गोंडाळ लाईन, खालची ओगलेवाडी, वरची ओगलेवाडी, रानतळे विभाग, मुजावर व इतर, रानतळे मुल्ला मास्तर वगैरे, बावधनकर, साखळकर /
कोळेकर, मांजरेकर व इतर.
आंबेवाडी, दि. २०, २२, २४, २६ याप्रमाणे पाणी चालू राहील. रानतळे दिनांक. २०,२३,२६,२९ याप्रमाणे पाणी चालू राहील.
ज्या ठिकाणी विद्युत पंपाद्वारे पाणी पुरवठा (बाजारपेठ विभाग, कोंडेतड विभाग, धोपेश्वरघाटी, दिवटेवाडी, खडपेवाडी विभाग, आंबेवाडी, रानतळे विभाग) केला जातो त्या ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाल्यास, त्या भागातील पाणी पुरवठयाच्या वेळात बदल होऊ शकेल याची नोंद घ्यावी असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.











