खेड पोलिसाची यशस्वी कामगिरी
खेड(प्रतिनिधी)सुरत, गुजरात राज्यातून बनावट ट्रेडिंग अॅप्लिकेशनचा व क्रिप्टो करन्सी व्दारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून २४ लाख ८५ हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले या प्रकरनात आता संशयितांची संख्या ४ इतकी झाली आहे
जिम्मीभाई सुनीलभाई भगत वय ४० वर्ष राहणार मोटिशेरी गलेमांडी सुरत गुजरात, व सोनू रामलाल टेलर वय २४ वर्ष रा. दिनोडली गाव सुरत गुजरात अशी त्या मुसक्या आवळण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत
१९ एप्रिल ते मे २०२४ या कालावधीत ए आर के लर्निंग ग्रुप या व्हॉटसअॅप ग्रुपवरील ट्रेडींग संदर्भातील गोष्टी मोबाईल क्रमांकावरुन येणा-या व्हॉटसअॅप मेसेज द्रवारे फिर्यादी यांना ARK Investment Group या कंपनीमध्ये पैश्याची गुंतवणूक करुन जास्तीत जास्त रकमेचा परतावा देण्यात येईल असे सांगून खेड मधील एका तरुणाची २४ लाख ८५ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली होती या प्रकरणी खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता
सुरत गुजरात येथून बनावट ट्रेडिंग अॅप्लीकेशनचा वापर करून व क्रिप्टो करन्सी व्दारे ट्रेडिंग करून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून व सिम कार्ड क्लोन अप्लिकेशन करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत
या गुन्ह्यामध्ये यापूर्वी नीरज महेंद्र जांगरा वय २३ वर्ष राहणार चंदिगढ, व नारायनलाल शंकरलाल जोशी वय ४७ वर्ष राहणार भावना पार्क १ सुरत गुजरात यांना यापूर्वी अटक करण्यात आलेली होते. सदर गुन्ह्यामध्ये अटक आरोपीत यांचे अन्य साथीदार यांचा तांत्रिक व गोपनीय माहितीचा आधारे जिम्मीभाई सुनीलभाई भगत वय ४० वर्ष राहणार मोटिशेरी गलेमांडी सुरत गुजरात, २) सोनू रामलाल टेलर वय २४ वर्ष रा. दिनोडली गाव सुरत गुजरात यांना १२ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली
अटक आरोपीत यांनी अद्याप पर्यंत क्रिप्टो करन्सी च्या नावाखाली वेगवेगळ्या व्यक्तीचे बँक खाते याचा वापर करून त्यात पैसे घेतले असलेबाबत निष्पन्न झालेले आहे. तसेच अॅप्लीकेशन वापर करून मेसेज डायव्हर्ट करणे याबाबत देखील अधिक तपास करत आहेत त्या दोघांकडून . ३० व १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
दरम्यान या गुन्ह्यात यापुर्वी अटक करण्यात आलेले नीरज महेंद्र जांगरा वय २३ वर्ष राहणार चंदिगढ, नारायनलाल शंकरलाल जोशी वय ४७ वर्ष राहणार भावना पार्क सुरत गुजरात हे दोघे अद्याप पर्यंत रत्नागिरी जेल मध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोयर हे करीत आहेत. पोलीस निरीक्षक श्री. नितीन भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाई मध्ये दिपक गोरे. कृष्णा बांगर, वैभव ओहोळ रमिज शेख निलेश शेलार , सौरभ कदम (सायबर पोलीस ठाणे) या कर्मचाऱ्या चा समावेश आहे










