महायुतीचा संयुक्त मेळाव्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे झाले मनोमिलन
मंत्री उदय सामंत,रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, आम.नितेश राणे, मनसेनेचे अविनाश जाधव होते उपस्थित
रत्नागिरी | प्रतिनिधी : ही निवडणूक कोकणासाठी ,राज्य आणि देशासाठी महत्वाची आहे. सिंधुदुर्ग जिल्हा ज्या पद्धतीने पाणी टंचाई मुक्त केला. रस्ते सुसज्ज केले. पर्यटन स्थळे विकसित केली. शिक्षणाची दालने खुली केली.आय एस आय पी एस मुलं झाली पाहिजेत. यासाठी सुविधा निर्माण केल्या,उद्योजक निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे.रत्नागिरी जिल्हा सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्या प्रमाणे सर्वांगीण विकसित केला जाईल,असे आश्वासन यावेळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी दिले.गेल्या दहा वर्षात विनायक राऊत यांनी काय काम केले ते दाखवा.कोणता विकास आणला ते दाखवा असे आव्हान सुद्धा दिले.
उदय सामंत, किरण सामंत यांच्या मतदार संघातून स्वाभिमानी देशप्रेमी असलेले कार्यकर्ते आहात महायुतीच्या या विजयात आपण मेहनत घेवून काळा समोरील बटन दाबून मोदी सरकार पुन्हा आन मला तीन लाखाच्या मताधिक्याने निवडून आणा असे आवाहन केले.
मी राजकारणात आहे आणि जी पदे मिळाली आणि राजकीय प्रतिष्ठा मिळाली याचे संपूर्ण श्रेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना देतो.मला मुख्यमंत्री केले त्यांनीच.आनेक पदे दिली. शिवसेना ६६ साली स्थापन झाली तेव्हा लहान असल्यापासून मी सदस्य आहे. जेव्हा मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा खूपच दुःखाने बाहेर पडलो. वडील आणि मुलगा यांच्यात वाद होवू नये म्हणून शिवसेना सोडली.या उलट उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व सोडून गेले.
मी आजही कार्यकर्ता म्हणून काम करत राहिलो. मला कोणत्याही पदाची घमेंड नाही.मात्र पुस्तक वाचनातून आणि नेत्यांची जीवनचरित्र वाचून स्वतात बदल केला आणि इतपर्यंत आलो.
समाज गैरसमज असतील तर एकत्र बसू आणि चर्चा करू मात्र मनात गैरसमज ठेवू नका. मी कोकणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही.मला अनेक लोक भेटतात आणि यावेळी पक्ष पाहणार नाही तुम्हाला मत देणार असे आश्वासन देत आहे. कारण मी जात पात धर्म पाहिला नाही. जो माझ्याकडे येईल त्याला मी मदत केली आहे.त्यामुळेच सर्वच पक्षातले लोक मला पाठींबा देत आहेत.मतदान करण्याचे आश्वासन देत आहेत. राणे यांना पदे मिळाली त्यातून कोकणी माणसाला विकास आणि स्वाभिमान दिला.एकनाथ शिंदे,नारायण राणे यांना शिवसेना सोडावी का लागली याचा विचार तुम्ही कार्यकर्त्यांनी करावा. आणि चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे आहे. उध्दव ठाकरे, संजय राऊत जे बोलतात ती त्यांची भाषा सभ्य राजकारण्यांची नाही. मोदी,शहा यांचेवर टीका करण्याची यांची पात्रता आहे काय ?अशा लोकांना त्यांची जागा मतपेटीतून दाखवून द्या.मनात कसलीही कटुता ठेवू नका मोदींसाठी,देशासाठी ,कोकणी माणसाला विजयी करण्यासाठी काम करूया असे आवाहन केले.










