निखिल नाईकसह दिग्गज खेळांडूची उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रितांच्या खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत ‘फ ‘ गटामध्ये अव्वल स्थान पटकावले व स्पर्धेच्या सुपर लीग सामन्यांसाठी पात्र झाला आहे. या पात्र संघातील खेळाडूंना मे. लक्ष्मीनारायण शिपिंग सिंधुदुर्ग चे मालक व युवा उद्योजक श्री अमेय प्रभू तेंडुलकर यांनी क्रिकेट जर्सी प्रदान केल्या.
या जर्सी प्रदान कार्यक्रमावेळी सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष बाळ चोडणकर, संघ व्यवस्थापक रघुनाथ धारणकर, असोसिएशनचे माजी सचिव दिनेश कुबडे, लेखापरीक्षक सुधीर नाईक, शंकर नाईक, संघाचा कर्णधार सर्वेश सावंत, संघातील प्रमुख खेळाडू व किंग्स इलेव्हन पंजाबचा आयपीएल खेळाडू निखिल नाईक, महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघाचा खेळाडू कु. प्रथमेश गावडे, मुंबई युनिव्हर्सिटी साठी निवड झालेला श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा खेळाडू व कर्णधार राजाराम गवस तसेच प्रशिक्षक महेश डोंगरे आदी उपस्थित होते.












