तळवली येथे रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं 1 चा स्तुत्य उपक्रम

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील श्री सुकाई देवी तरुण हौशी मंडळ आगरवाडी नं.1 च्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून नुकतेच इंडियन रेडक्रॉस संस्था रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला वाडीतील सभासदांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी एकूण 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या मंडळाकडून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून विविध उपक्रम राबविले जातात.याच अनुषंगाने मंडळाच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रेड क्रॉस चे डॉ.जोशी,डॉ.कांबळे यांनी या शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.रक्तदानाची गरज ओळखुन हा स्तुत्य उपक्रम या मंडळाकडून राबविण्यात आला.या शिबिरासाठी वाडीतील सर्व सभासदांनी मेहनत घेतली.