यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
शिरगाव( प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील शिरगाव येथील श्री.हनुमान सेवा मंडळाच्यावतीने शिरगाव बाजारपेठेतील श्री हनुमान मंदिरात मंगळवार २३ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ६.१५ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, पूजा, आरती, सकाळी ९ वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता पालखी मिरवणूक, रात्रौ ९.३० वाजता रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. हनुमान सेवा मंडळाने केले आहे.











